Marathi Ukhane For Female: स्त्रियांसाठी मराठी उखाणे.

Marathi Ukhane For Female : स्त्रियांसाठी मराठी उखाणे. हे खास नवरीकरिता बनवण्यात आले आहेत. हे समजायला आणि बोलायला फार सोपे आहेत. हे उखाणे घेतले तर तुमचे पती आणि पाहुणे मंडळी नक्कीच खुश होणार. हे उखाणे खास महिलांकरिता आहेत.विविध समारंभात नाव घे म्हणजेच उखाणे घेत असतात विशेषतः लग्न काळात नव वधु व वर या दोघांनाही नातेवाईकांकढून नाव घे म्हणजेच उखाणे घेण्यासाठी आग्रह केला जातो त्यामुळेच जर का तुमचे नुकतेच लग्न ठरले असतील तर आधीच उखाणे जाणून घ्या, चला तर जाणून घेवूया काही सोपे, मजेदार लक्षात राहतील असे उखाणे.

वटपूणिर्मा स्पेशल उखाणे :

Marathi Ukhane For Female.


वटपौर्णिमेला व्रत ठेवायची आहे प्रथा, ………… रावांसोबत ऐकेन आज वटसावित्रीची कथा.

संत तुकोबाची वाणी भक्तीची ती शिकवणी…………. रावांचे नाव घेत आज गाऊया सुहासनीसाठी गाणी.

वटवृक्षाच्या झाडाला, प्रदक्षिणा घातल्या सात, …………. रावांचे नाव घेते, आपल्या सर्वांचे असूदे आमच्यावर हात.

पावसाची झाली सुरुवात, आणि आज आहे पहिला सन, वटवृक्ष बहरले तसेच…………. रावांचे बहरूदे मन.

सावित्री ने केली सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड,………….. रावांची होती मला कॉलेज पासून आवड.

पाच सुवासिनी स्त्रियांची ओटी भरली,…………….
रावांचे नाव घेते आज वटपौर्णिमा आहे म्हणून मी सजली.

वटवृक्षाची पूजा करून, गरजू व्यक्तीला करावे दान…………
रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान.

वडाची पूजा मनोभावे करते
वटपौर्णिमेच्या दिवशी,……….‌.
रावांसाठी दीर्घायुष्य मागते सर्वांना ठेवून साक्षी.

Read more –Suvichar In Hindi Status: हिंदी स्टेटस.

नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे,
……. रावा सारखे पती मला जन्मोजन्मी मिळावे..

वटवृक्षाच्या झाडाला, प्रदक्षिणा घातल्या सात, …………. रावांचे नाव घेते, आपल्या सर्वांचे असूदे आमच्यावर हात.

यंदाची वटपौर्णिमेची तारीख आहे, २१ जून,
______________ रावांचे नाव घेते, पाटील घराण्याची सून.

वटवृक्षाच्या झाडाला, प्रदक्षिणा घातल्या सात,
_________ रावांचे नाव घेते, आपल्या सर्वांचे असुदे आमच्यावर आशीर्वादाचे हात.

तुटता तारा पाहून, माझी पूर्ण झाली आहे इच्छा,
____________ रावांचे नाव घेते, तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

पाच सुहासिनी स्त्रियांची, ओटी मी भरली,
_____ रावांचे नाव घेते, आज वटपौर्णिमा आहे म्हणून मी सजली.

नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश,
________ रावांसोबत लग्न होताच, पडला माझ्या आयुष्यात प्रकाश.

सृष्टीने जसे वडाचे झाड, वर्षानुवर्षे जपले,
_______ सुखी राहूद्या जन्मोजन्मी, असेच नाते अपुले.

हवी अंधारल्या राती, चंद्र किरणांची साथ,
________ रावांची हवी मला, ७ जन्माची साथ.

आजच्या दिवशी, वडाची पूजा करण्याची आहे प्रथा,
________ रावांसोबत ऐकेन मी, सावित्री आणि सत्यवानाची कथा.

पंढरपूरच्या विठोबाच्या पायाखाली वीट…….
रावांचं नाव घेते लक्ष द्या नीट.

 सण आहे आज वटपौर्णिमेचा,
_______ रावांसोबत असाच, संसार राहूदे सुखाचा.

मराठी सण म्हणजे, आनंदाचा क्षण,
_______ रावांचे नाव घेते, सुखी राहुदेत सर्वजण.

वडापुढे लावली तुपाची फुलवात,
सुख-समृद्धी ,आरोग्य लाभो
……. रावांच्या जीवनात.

Marathi Ukhane For Female: स्त्रियांसाठी मराठी उखाणे.

सर्व कार्याचा पाठीराखा विघ्नहर्ता गणेश 
…राव आहेत आजपासून माझ्या जीवनाचे परमेश.

सप्तपदीच्या सात पावलांनी मार्ग आक्रमिते नवजीवनाचा
…च्या संसारात आशा करते आनंदाच्या.

पूजिला गौरीहार दिला आशीर्वाद 
…च्या प्रवेशते संसारात निर्विवाद.

रातराणीचा सुगंध, त्यात मंद वारा,
… रावांचे नांवाचा, भरला हिरवा चुडा.

मंगलदिनी दिला सर्वांनी प्रेमाचा आहेर, 
…च्या करिता सोडते आज माहेर.

 सप्तपदीच्या सात पावलांनी मार्ग आक्रमिते नवजीवनाचा
…च्या संसारात आशा करते आनंदाच्या.

मंगलदिनी दिला सर्वांनी प्रेमाचा आहेर, 
…च्या करिता सोडते आज माहेर.

गुळाची गोडी अन् फुलांचा सुगंध,
…. रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.

Treading

Marathi Suvichar

Marathi Suvichar/मराठी सुविचार वाचण्यासाठी Read More बटन वर क्लिक करा - thehiddendairies.com

Marathi Suvichar

Swami Samarth Quotes:स्वामी समर्थ स्टेटस मराठी मध्ये read करण्यासाठी image वर क्लिक करा- thehiddendiaries.com

Motivational Quotes

To Read the Best Motivational Quotes to click on the image-thehiddendiaries.com

हिंदी

हिंदी सुविचार Download करने के लिए फोटो पर क्लिक करे। -thehiddendiaries.com

More Posts